भारतासाठी वाईट बातमी...

 ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव केल्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानची डोकदुखी वाढली आहे.  ऑस्ट्रेलियाने बांगलादेश पराभव केल्याने अंक तालिकेत त्यांच्या नावावर दोन गुण झाले आहेत. 

Updated: Mar 21, 2016, 10:53 PM IST
भारतासाठी वाईट बातमी... title=

बंगळुरू :  ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव केल्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानची डोकदुखी वाढली आहे.  ऑस्ट्रेलियाने बांगलादेश पराभव केल्याने अंक तालिकेत त्यांच्या नावावर दोन गुण झाले आहेत. 

न्यूझीलंड टॉपवर 

न्यूझीलंडने दोन सामने  जिंकून बी ग्रुपमध्ये ४ गुणांनी अव्वल स्थान पटकावले आहे.  त्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. त्यांचा पुढील सामना पाकिस्तानशी होणार आहे. 

भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया बरोबरीत

ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव केला त्यामुळे त्यांना दोन गुण मिळाले आहे. पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केल्याने त्यांच्या खात्यात दोन गुण आहेत. आणि भारताने पाकिस्तानचा पराभव केल्याने त्यांच्या खात्यातही दोन गुण आहेत. 

पुढे काय होणार... 

पाकिस्तान - पाकिस्तानचे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांच्याशी सामने होणार आहे. त्यामुळे त्यांना दोन्ही सामने जिंकणे गरजे आहे. 

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियाचा भारत आणि पाकिस्तानशी सामने शिल्लक आहेत. 

भारत - भारताचा बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाशी सामना शिल्लक आहे. त्यामुळे आता या स्पर्धेला रंजक वळण लागले आहे.