मनोहर यांचा आयसीसीसाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आयसीसी अध्यक्षपदासाठी मनोहर यांनी बीसीसीआयंचं अध्यक्षपद सोडलंय. आयसीसीच्या नव्या नियमानुसार आयसीसीचा अध्यक्ष दोन पदावर राहू शकत नाही. आणि त्यामुळे मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपद सोडावं लागलंय. 

Updated: May 10, 2016, 05:14 PM IST
मनोहर यांचा आयसीसीसाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा title=

मुंबई : शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आयसीसी अध्यक्षपदासाठी मनोहर यांनी बीसीसीआयंचं अध्यक्षपद सोडलंय. आयसीसीच्या नव्या नियमानुसार आयसीसीचा अध्यक्ष दोन पदावर राहू शकत नाही. आणि त्यामुळे मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपद सोडावं लागलंय. 

सप्टेंबर 2015 मध्ये जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर मनोहर यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. दरम्यान, मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत बोर्डाचा नवा अध्यक्ष कोण होणार याकडे सा-यांचच लक्ष असणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार आता त्यामुळे बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जातंय.