युवराज सिंगकडून अमली पदार्थांचं सेवन?

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगवर अमली पदार्थांच्या सेवनाचा तसंच धुम्रपानाचा आरोप त्याचीच वहिनी आकांक्षा शर्मानं केला आहे.

Updated: Oct 31, 2016, 05:41 PM IST
युवराज सिंगकडून अमली पदार्थांचं सेवन? title=

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगवर अमली पदार्थांच्या सेवनाचा तसंच धुम्रपानाचा आरोप त्याचीच वहिनी आकांक्षा शर्मानं केला आहे. खुद्द युवराजनंच ही गोष्ट आपल्याला सांगितली असल्याचा दावाही आकांक्षानं केला आहे. बिग बॉस 10च्या घरातून दुसऱ्या आठवड्यातून आकांक्षा बाहेर पडली, यानंतर तिनं बॉलीवूड लाईफ या वेबसाईटला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये आकांक्षानं युवराजबरोबरच त्याची आई शबनम आणि युवराजचा भाऊ झोरावरबद्दलही गंभीर आरोप केले आहेत.

झोरावर आणि माझं लग्न फक्त कागदावरच झालं होतं. झोरावर आणि माझ्यामध्ये कोणतंच नातं नव्हतं असंही आकांक्षा म्हणाली आहे. शबनमनी माझा मानसिक छळ केल्याचा आरोपही आकांक्षानं केला आहे.

झोरावरबरोबर हनीमूनला जाताना शबनम या आमच्याबरोबर आल्या. त्यामुळे ते हनीमून नव्हतं तर फॅमिलीमून होतं अशी प्रतिक्रियाही आकांक्षानं दिली आहे. आयपीएल दुबईमध्ये होणार होतं, म्हणूनच जाणूनबुजून आम्हालाही दुबईलाच हनीमूनला नेण्यात आल्याचा आरोपही आकांक्षानं केला आहे.