महान बॉक्सर मोहम्मद अली यांचे निधन

महान बॉक्सर मोहम्मद अली यांचे शनिवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. 

Updated: Jun 4, 2016, 05:50 PM IST
महान बॉक्सर मोहम्मद अली यांचे निधन title=

कॅलिफोर्निया : महान बॉक्सर मोहम्मद अली यांचे शनिवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. 

श्वसनाच्या त्रासामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन वेळा विश्व चॅम्पियन ठरलेल्या अली यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. 

१९८४पासून ते पार्किन्सन या आजाराने ग्रस्त होते. १९६४मध्ये पहिल्यांदा त्यांनी विश्व चॅम्पियनचा खिताब जिंकला. त्यानंतर १९७४ आणि १९७८मध्ये त्यांनी पुन्हा चॅम्पियनवर नाव कोरले.