ब्रॅड हॅडिनची वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर-फंलदाज ब्रॅड हॅडिनने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हॅडिनने वेस्टइंडिजच्या दौऱ्यादरम्यान ही घोषणा केली आहे. 

Updated: May 17, 2015, 04:22 PM IST
ब्रॅड हॅडिनची वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती title=

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर-फंलदाज ब्रॅड हॅडिनने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हॅडिनने वेस्टइंडिजच्या दौऱ्यादरम्यान ही घोषणा केली आहे. 

१२६ वनडे सामने खेळणाऱ्या हॅडिनच्या करिअरची सुरूवात २००१मध्ये जिम्बाब्वेविरूद्ध हॉबार्डमध्ये झाली होती. वनडे करिअरमध्ये हॅडिनने १७० कॅच आणि ११ फलंदाजांना स्पंप आउट केलं आहे. इयान हिली आणि अॅडम गिलक्रिस्ट यांच्यानंतरचा हॅडिन सर्वात यशस्वी विकेटकीपर आहे. हॅडिनने ३१.५३च्या सरासरीने ३१२२ धावा केल्या आहेत. ११० ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. 

निवृत्तीची घोषणा करतांनी हॅडिनने सांगितले की, मी खूप भाग्यशाली आहे, कारण मी माझ्या करिअरमध्ये तीन वर्ल्ड कप खेळलो आहे. ही निवृत्ती घेण्याची योग्य वेळ आहे. मी ऑस्ट्रेलिया टीमला त्यावेळी सोडत आहे, ज्यावेळी टीम सर्वोत्कृष्ट आहे. मी जे काही साध्य केलं आहे, त्याचा मला अभिमान आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.