रिओमध्ये पत्रकारांच्या गाडीवर गोळीबार

रिओ ऑलिम्पिकच्या परिसरात आज पत्रकारांच्या गाडीवर गोळीबार झाल्याचं समोर येतंय. हल्लेखोरानं रिओ अलिम्पकच्या अरिनातून बाहेर निघणाऱ्या बसवर दोन गोळ्या झाडल्याचं पुढे येतय. 

Updated: Aug 10, 2016, 09:00 AM IST
रिओमध्ये पत्रकारांच्या गाडीवर गोळीबार title=

रिओ : रिओ ऑलिम्पिकच्या परिसरात आज पत्रकारांच्या गाडीवर गोळीबार झाल्याचं समोर येतंय. हल्लेखोरानं रिओ अलिम्पकच्या अरिनातून बाहेर निघणाऱ्या बसवर दोन गोळ्या झाडल्याचं पुढे येतय. 

या हल्ल्यात कुणीही जखमी झालेलं नाही. हल्ला स्थनिक गुंडाच्या टोळीनं केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. 

दरम्यान, पोलिसांकडून कुठलीही अधिकृत माहिती मात्र जारी करण्यात आलेली नाही. त्यामुळए हल्ल्याविषयीही संभ्रमाचं वातावरण आहे. हल्लेखोराचा तपास सुरु आहे.