झोपेतही सॅमीच्या हातात वर्ल्डकप ट्रॉफी

यंदाचा टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर वेस्ट इंडिज संघाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. विजयानंतर कॅरेबियन संघाने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. त्यांचा सेलिब्रेशनचा सोहळा हा नेहमीच पाहण्यासारखा असतो.

Updated: Apr 5, 2016, 08:59 AM IST
झोपेतही सॅमीच्या हातात वर्ल्डकप ट्रॉफी title=

कोलकाता : यंदाचा टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर वेस्ट इंडिज संघाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. विजयानंतर कॅरेबियन संघाने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. त्यांचा सेलिब्रेशनचा सोहळा हा नेहमीच पाहण्यासारखा असतो.

वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार डॅरेन सॅमीसाठी ही वर्ल्डकप ट्रॉफी म्हणजे सुखद स्वप्न आहे. त्यामुळे त्याने झोपेतही ट्रॉफी आपल्या हातातच ठेवली. 

त्याचा नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. यात सॅमी झोपेत आहे मात्र झोपेतही त्याने ट्रॉफी हातात घट्ट पकडून ठेवलीये. तो ती ट्रॉफी सोडायला तयार नाहीये. 

पाहा हा व्हिडीओ