विश्वनाथन आनंदला मातृशोक

माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदची आई सुशीला विश्वनाथन यांचं निधन झालं. सुशीला विश्वनाथन या 79 वर्षांच्या होत्या, झोपेत असतांनाच त्यांचं निधन झालं. 

Updated: May 27, 2015, 08:05 PM IST
विश्वनाथन आनंदला मातृशोक title=

चेन्नई : माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदची आई सुशीला विश्वनाथन यांचं निधन झालं. सुशीला विश्वनाथन या 79 वर्षांच्या होत्या, झोपेत असतांनाच त्यांचं निधन झालं. 

सुशीला विश्वनाथन यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सुशीला विश्वनाथन यांनी घेतलेल्या मेहनत आणि कष्टांमुळेच त्या विश्वनाथन आनंद मधील एक चॅम्पियन घडवू शकल्या, असे अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष पी.व्ही.आर. वेंकटरामन यांनी म्हटले आहे.

विश्वनाथन परिवारात विश्वनाथन आनंद हा सर्वात लहान आहे. सुशीला विश्वनाथन यांच्या मागे पती के. विश्वनाथन, एक मुलगी, दोन मुले, सून आणि नातू असा परिवार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.