कोहलीच्या कामगिरीवर गेलने दिली मोठी प्रतिक्रिया

भारताचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहलीच्या सध्याचा फार्म वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर क्रिस गेलसाठी हैरान करणारा नाही आहे. त्याने म्हटलं की, 'सगळ्यांना माहित आहे की विराट एक शानदार फलंदाज आहे. त्याने जे काही केलं ते हैराण करणारं नाही आहे. निश्चितच अजून बरंच काही येणं बाकी आहे.'

Updated: Dec 13, 2016, 09:59 AM IST
कोहलीच्या कामगिरीवर गेलने दिली मोठी प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : भारताचा टेस्ट फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहलीच्या सध्याचा फार्म वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटर क्रिस गेलसाठी हैरान करणारा नाही आहे. त्याने म्हटलं की, 'सगळ्यांना माहित आहे की विराट एक शानदार फलंदाज आहे. त्याने जे काही केलं ते हैराण करणारं नाही आहे. निश्चितच अजून बरंच काही येणं बाकी आहे.'

कोहलीने मागील ३ सिरीजमध्ये ३ दुहेरी शतक ठोकले आहेत. इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या या सिरीजमध्ये चार सामन्यांमध्ये त्याने ६४० रन्स केले आहेत. गेल यूएसएल-डियाजियोच्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या समर्थनासाठी आला आहे. गेलने या अभियानाच्या प्रती प्रतिबद्ध असल्याचं सांगितलं आणि त्याने शपथ घेतली की तो कधीही मद्यपान करुन गाडी नाही चालवणार. गेलने म्हटलं की, भारताचं त्याच्या हृद्यात विशेष स्थान आहे. येथील लोकांनी नेहमी माझा स्विकार केला आहे.