ख्रिस गेलचे वादळ, ठोकल्या २१५ रन्स

फोर, सिक्स लगावत वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल झिम्बाब्वे बॉलरसाठी कर्दनकाळ ठरला. गेलच्या वादळापुढे झिम्बाब्वे बॉलर सपशेल अपयशी ठरलेत. फोर आणि सिक्सची आतषबाजी करत ख्रिस गेलने शानदार द्विशतकी केले. वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी ३७३ रन्सचा डोंगर उभा केला.

AP | Updated: Feb 24, 2015, 01:00 PM IST
ख्रिस गेलचे वादळ, ठोकल्या २१५ रन्स title=

कॅनबेरा : फोर, सिक्स लगावत वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल झिम्बाब्वे बॉलरसाठी कर्दनकाळ ठरला. गेलच्या वादळापुढे झिम्बाब्वे बॉलर सपशेल अपयशी ठरलेत. फोर आणि सिक्सची आतषबाजी करत ख्रिस गेलने शानदार द्विशतकी केले. वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी ३७३ रन्सचा डोंगर उभा केला.

वेस्ट इंडीजचा सलामीवीर ड्वेन स्मिथ पहिल्याच षटकात पानयंगरा शून्यावर आऊट झाला. मात्र, विकेट न गमावता ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युल्सने मोठी खेळी केली. विकेटवर टिकून राहत ३७३ रन्सचे मोठे टार्गेट झिम्बाब्वेसमोर ठेवले. दोघांनी एक-एक रन्स घेत सुरवातीला संयमी बॅटींग केली. शतकी भागिदारी नोंदविल्यानंतर दोघांनीही आपल्या खेळीमध्ये आक्रमकता आणली. फोर आणि सिक्सची आतषबाजी करत क्रीडारसिकांना सुखद धक्का दिला.

वेस्ट इंडीजने फलकावर २०० रन्स नोंदविल्यानंतर गेल आणि  स्मिथने गोलंदाज्यावर हल्लाबोल चढविला. गेलने १०५ बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत पुढच्या ३२ बॉलमध्ये १०० रन्स करत द्विशतक पूर्ण केले.  गेलने १० फोर आणि १६ सिक्स मारलेत. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत द्विशतक करणारा ख्रिस गेल हा पहिला खेळाडू ठरला आहे. 

यापूर्वी गॅरी कर्स्टनच्या नावावर १८९ रन्सची सर्वोच्च खेळी होती. अखेरपर्यंत या दोघांनी फलंदाजी करत झिंबाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली. विंडीजचे निर्धारित ५० ओव्हरमध्ये २ विकेट गमावत ३७२ रन्स केल्यात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.