सेमीफायनलआधी 'कॅप्टन कूल' धोनी गोल्फ खेळण्यात मग्न

चंदीगढ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलच्या आधी 'कॅप्टन कूल' धोनी रिलॅक्स दिसला.

Updated: Mar 26, 2016, 11:20 AM IST
सेमीफायनलआधी 'कॅप्टन कूल' धोनी गोल्फ खेळण्यात मग्न title=

चंदीगढ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलच्या आधी 'कॅप्टन कूल' धोनी रिलॅक्स दिसला.

शुक्रवारी त्याने त्याच्या सरावातून थोडा वेळ काढला आणि तो पोहोचला थेट गोल्फ खेळायला... यावेळी त्याच्यासोबत रोहित शर्मा आणि रवी शास्त्रीसुद्धा होते.

खरं तर शुक्रवारी मोहालीमध्येच ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचा सामना सुरू होता. पण, तिथून केवळ १२ किलोमीटरवर चंदीगढच्या गोल्फ क्लबमध्ये धोनी दुसराच खेळ खेळण्यात व्यस्त होता.

रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलियात सामना होणार आहे. पण, त्याआधी धोनी गोल्फ खेळायला जाणे म्हणजे टीम इंडियाविषयी त्याचा आत्मविश्वास दृढ असल्याचे लक्षण मानले जात आहे.

गुरुवारीच भारतीय संघ चंदीगढमध्ये दाखल झाला. आज म्हणजे शनिवारी पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात टीम इंडिया जोरदार सरावही करणार आहे.