धोनीला केले पुण्याचे कर्णधार

कोलकत्ता : 'इंडियन प्रिमीअर लीग' म्हणजेच 'आयपीएल'च्या येत्या सीझनसाठी नवीन संघाची घोषणा झाली आहे. 

Updated: Jan 18, 2016, 06:28 PM IST
धोनीला केले पुण्याचे कर्णधार  title=

कोलकत्ता : 'इंडियन प्रिमीअर लीग' म्हणजेच 'आयपीएल'च्या येत्या सीझनसाठी नवीन संघाची घोषणा झाली आहे. या नव्या संघाचं नाव 'रायजिंग पुणे सुपरजायंट' असून संजीव गोएंका याचे मालक आहेत. तर  महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार असेल. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आज त्यांनी संघाचा लोगो लाँच केला आणि धोनी २०१६ च्या सीझनसाठी संघाचा कर्णधार असल्याची घोषणा केली. "धोनी हा एक उत्तम खेळाडू राहिलाय. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याची कारकीर्द उत्तम राहीली आहे. त्यामुळे तो संघाला मैदानावर आणि मैदानाबाहेर उत्तम स्थितीत ठेवेल अशी आम्हाला खात्री आहे", असं गोएंका म्हणाले. 



स्टीव्ह स्मिथ, फॅफ ड्यू पेलीस, अजिंक्य रहाणे, आर अश्विन अशा अनुभवी खेळाडूंचा संघात समावेश असेल. 

चेन्नई सुपरकिंगच्या माईक हसीचा संघात समावेश असेल का असे विचारले असता "हा संघ सी. एस. नाही. केवळ एक व्यक्ती इथे आल्यामुळे हा संघही सी. एस. के. होत नसतो," असे गोएंका म्हणाले.