धोनीकडे पुन्हा कर्णधारपदाची धुरा

आयपीएलच्या पुण्याच्या टीमचं नेतृत्तव धोनीकडून काढून ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला देण्यात आलं.

Updated: Feb 22, 2017, 01:18 PM IST
धोनीकडे पुन्हा कर्णधारपदाची धुरा  title=

मुंबई : आयपीएलच्या पुण्याच्या टीमचं नेतृत्तव धोनीकडून काढून ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला देण्यात आलं. पण आता धोनीला पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये धोनी झारखंडच्या संघाचं नेतृत्व करताना दिसेल.

50 ओव्हरची विजय हजारे ट्रॉफी 25 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. मागच्या वर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये धोनी झारखंडकडूनच वरुण अरॉनच्या नेतृत्वाखाली खेळला होता. मागच्या रणजी सिझनमध्ये धोनीनं झारखंड संघाच्या सल्लागाराची भूमिका बजावली होती. याच सिझनमध्ये झारखंडला सेमी फायनलपर्यंत मजल मारता आली होती.