दुसऱ्या डावात लंचपर्यंत इंग्लंडच्या बिनबाद 97 धावा

भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 97 धावा केल्यात. अखेरची कसोटी अनिर्णीत होण्याच्या मार्गावर आहे. 

Updated: Dec 20, 2016, 11:45 AM IST
दुसऱ्या डावात लंचपर्यंत इंग्लंडच्या बिनबाद 97 धावा title=

चेन्नई : भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 97 धावा केल्यात. अखेरची कसोटी अनिर्णीत होण्याच्या मार्गावर आहे. 

मैदानावर अॅलेस्टर कूक 47 तर कीटॉन जेनिंग्स 46 धावांवर खेळत आहेत. भारताने दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी केली. मात्र अद्याप एकही गडी मिळवण्यात यश मिळालेले नाही.

याआधी चौथ्या दिवशी करुण नायरच्या नाबाद 303 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने 759 धावांचा डोंगर उभा केला होता.