क्रिस गेलवर महिला पत्रकारांचे गंभीर आरोप

क्रिकेटमध्ये तुफानी खेळी करणारा क्रिस गेल आता चांगलाच अडचणीत येतांना दिसतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रेजेंटरला फ्लर्ट केल्यामुळे त्याला ७००० डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता.

Updated: Jan 6, 2016, 10:57 PM IST
क्रिस गेलवर महिला पत्रकारांचे गंभीर आरोप title=

सिडनी : क्रिकेटमध्ये तुफानी खेळी करणारा क्रिस गेल आता चांगलाच अडचणीत येतांना दिसतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रेजेंटरला फ्लर्ट केल्यामुळे त्याला ७००० डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता.

टेन नेटवर्कच्या रिपोर्टर सोबत फ्लर्ट केल्यानंतर प्रकरणाला वेगळच वळण लागलं. या प्रकरणानंतर वेस्टइंडिज मधल्या आणखी काही महिला पत्रकारांनी गेलविरोधात तक्रार केली आहे.

फॉक्स स्पोर्टसची रिपोटर नेरोली मीडोजने गेलला लिजलिजा म्हटलं आहे. २०११ मध्येही तिने गेलला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा गेलने म्हटलं की, 'सॉरी तुझ्या सुंदर चेहऱ्यामुळे माझं लक्ष भंग झालं. तु पुन्हा प्रश्न विचारु शकते का ?' असा आरोप नरोली हिने केला आहे.

नाईन न्यूजच्या एका रिपोर्टरनेही गेलवर गंभीर आरोप केले आहे. गेलने यावोने हिला एकदा इंटरव्यूव घेतांना पाहिलं होतं आणि त्यानंतर तिला ट्विटवर डेटवर जाण्यासाठीचा प्रस्ताव ठेवला होता.