T-20 : ऑस्ट्रेलियाचा गाशा गुंडाळला, भारत विजयी

पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया ३७ धावांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. आज भारताच्या संघाने दोनवेळा अॅडलेडवर तिरंगा फडकविला. सुरूवातीला महिला संघाने आणि आता पुरूषांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ही कामगिरी केली आहे. 

Updated: Jan 26, 2016, 06:18 PM IST
T-20 : ऑस्ट्रेलियाचा गाशा गुंडाळला, भारत विजयी  title=

अॅडलेड : पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया ३७ धावांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. आज भारताच्या संघाने दोनवेळा अॅडलेडवर तिरंगा फडकविला. सुरूवातीला महिला संघाने आणि आता पुरूषांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ही कामगिरी केली आहे. 

 कोहलीच्या धडाकेबाज नाबाद ९०, रैनाच्या संयमी ४१ धावा आणि त्यानंतर भारतीय गोलंदाज बुरराह, पांड्या, जडेजा, अश्विन आणि नेहरा यांनी केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ १५१ धावांमध्ये गारद झाला. 

विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्या धडाकेबाज शतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या टी ट्वेण्टी सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर १८९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने निर्धारित २० षटकांत ३ बाद १८८ धावा केल्या होत्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना कांगारुंचा संघ १९.३ षटकांत १५१ धावांत गारद झाला. भारताकडून नवख्या जसप्रीत बुमराहने 3 तर जडेजा, अश्विन आणि हार्दिक पांड्याने प्रत्येक 2, तर अनेक वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या आशिष नेहराने 1 विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंचने सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर स्टिव्हन स्मिथ २१, वॉर्नर आणि ख्रिस लिन यांनी प्रत्येकी १७ धावा केल्या. या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजांला मोठी धावसंख्या करता आली नाही.

 

या सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताचे सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरले. रोहित शर्मा २० चेंडूत झटपट ३१  धावा करून माघारी परतला. तर शिखर धवन अवघ्या ५ धावांवर बाद झाला. शेन वॉटसनने एकाच षटकात दोघांना तंबूत धाडलं.

यानंतर आलेल्या विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी खेळाची सूत्रं हाती घेतली. रैनाने एकेरी धाव घेत कोहलीला साथ दिली. कोहलीने दमदार फटकेबाजी केली.