भारताचा ऐतिहासिक मालिका विजय, आफ्रिकेला ३-० ने दिला व्हाईटवॉश

अखेरच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेवर तब्बल ३३७ धावांनी विजय मिळवत भारताने घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला. नंबर वन टीम असलेल्या आफ्रिकेला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. फिरकी गोलंदाजी भारताच्या विजयाच्या प्रमुख वैशिष्ट्य ठरले. भारताने विजयासाठी दिलेले ४८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव १४३ धावांवर संपुष्टात आला

Updated: Dec 7, 2015, 03:27 PM IST
भारताचा ऐतिहासिक मालिका विजय, आफ्रिकेला ३-० ने दिला व्हाईटवॉश title=

नवी दिल्ली : अखेरच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेवर तब्बल ३३७ धावांनी विजय मिळवत भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका सारख्या मातब्बर संघाविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. नंबर वन टीम असलेल्या आफ्रिकेला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. फिरकी गोलंदाजी भारताच्या विजयाच्या प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

चौथ्या कसोटीतील दुसऱ्या डावात आफ्रिकेसमोर विजयासाठी ४८१ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्यांचा संघ अवघ्या १४३ धावांत ढेपाळला. अश्विनच्या पंचक माऱ्यासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी पुन्हा नांगी टाकली. अश्विनने ६१ धावांत पाच विकेट घेत मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला. 

भारताने यापूर्वीच चार सामन्याच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली. अखेरचा कसोटी सामना जिंकत व्हाईटवॉश टाळण्याची संधी आफ्रिकेला होती. मात्र त्यांना संधीचा फायदा उचलता आला नाही. संपूर्ण मालिकेत भारताच्या स्पिनर्सनी आफ्रिकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्या फिरकी माऱ्याने आफ्रिकेच्या फलंदाजांना कोणत्याच सामन्यात मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. 

वनडे मालिका आणि टी-२० मालिकेत वर्चस्व गाजवणारा आफ्रिका संघ कसोटी मालिकेत पुरता नापास ठरला. भारताने दिमाखदार कामगिरी करताना यहाँ के हम सिकंदर असे म्हणत घरच्या मैदानावर मालिका विजय मिळवला. 

चौथ्या कसोटीत दोन्ही डावात शतके ठोकणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर आर. अश्विनने मालिकावीराचा पुरस्कार मिळवला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.