ऑस्ट्रेलियामध्ये भारताची विजयाने सुरूवात,चमकला नवा तेज गोलंदाज

 भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्या सराव सामन्यात सकारात्मक सुरूवात केली आहे.

Updated: Jan 8, 2016, 09:17 PM IST
ऑस्ट्रेलियामध्ये भारताची विजयाने सुरूवात,चमकला नवा तेज गोलंदाज title=

पर्थ :  भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्या सराव सामन्यात सकारात्मक सुरूवात केली आहे. आज पर्थमध्ये विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या अर्धशतकांच्या मदतीने पहिल्या टी-२० सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रिलेयाच्या दुसऱ्या दर्जाच्या संघाला ७४ धावांनी पराभूत केले. 

भारताने पहिल्यांदा फलंदाजी करतना धवन (७४) कोहली (७४) धावांच्या मदतनी २० षटकात १९२ धावा केल्या. 

Barinder Sran impressed in his first game in India colours taking two early wickets © AFP

वाकाच्या उसळत्या विकेटवर रोहित शर्मा (६) धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी विराट आणि शिखरने १४९ धावांची भागिदारी केली. तर चौथ्या क्रमांकावर आलेल्या महेंद्र सिंग धोनी याने १४ चेंडूत २२ धावा केल्या. 

भारताच्या १९२ धावांच्या पाठलाग करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघन ११८ धावांवर गारद झाला. भारताच्या विजयात नवखा डावखुरा गोलंदाज बरिंदर सरन याने चार ओव्हरमध्ये २४ धावा देऊन दोन विकेट घेतल्या. 

सरन याने योग्य लाइन लेंथने फलंदाजांना सतावले. त्याने काही चेंडू चांगले स्विंग केले.