भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, ६-२ ने मिळवला विजय

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुळ चारत भारतानं आठव्या ज्युनियर मेन्स एशिया कप हॉकीवर आपलं नाव कोरलं. 

Updated: Nov 23, 2015, 06:41 PM IST
भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, ६-२ ने मिळवला विजय  title=

मुंबई : पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुळ चारत भारतानं आठव्या ज्युनियर मेन्स एशिया कप हॉकीवर आपलं नाव कोरलं. 

क्वाटानच्या विस्मा बेलिया हॉकी स्टेडियमवर भारतानं पाकिस्तानचा 6-2 नं धुव्वा उडवला. हरमनप्रीत भारताच्या विजयाचा ख-याअर्थानं शिल्पकार ठरला. त्यानं चार पेनल्टी कॉर्नर्सचं रुपांतर गोलमध्ये करत आपल्या टीमला विजय साकारुन दिला. 

फायनल मॅचवर भारतीय ज्युनियर हॉ़की टीमनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. भारताच्या धडाक्यासमोर पाकिस्तानच्या टीमचं काहीच चालल नाही. आणि भारतीय ज्युनियर हॉकी टीमनं एशिया कपचं अजिंक्यपद पटकावलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.