भारत टी-२० वर्ल्डकप जिंकू शकतो

पुढील वर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकू शकतो असा विश्वास भारताचे माजी कर्णधार कृष्णामचारी श्रीकांत यांनी व्यक्त केलाय. भारत या वर्ल्डकपचे आयोजन करत आहे. 

Updated: Nov 19, 2015, 01:08 PM IST
भारत टी-२० वर्ल्डकप जिंकू शकतो title=

हैदराबाद : पुढील वर्षी होणारा टी-२० वर्ल्डकप भारत जिंकू शकतो असा विश्वास भारताचे माजी कर्णधार कृष्णामचारी श्रीकांत यांनी व्यक्त केलाय. भारत या वर्ल्डकपचे आयोजन करत आहे. 

'टी-२० किक्रेट प्रकारात भारताची कामगिरी नेहमी चांगली राहिली आहे. मला विश्वास आहे की, आगामी वर्ल्डकपमध्ये भारत चांगले प्रदर्शन करेल आणि काय माहीत? भारत २०१६चा वर्ल्डकपही जिंकेल', दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीमध्येही भारत चांगला खेळ करत असल्याचे श्रीकांत म्हणाले. 

'मोहालीमध्ये आपण दक्षिण आफ्रिकेला सहज हरवले. मात्र दुसऱ्या कसोटीत पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ नाही झाली. नाहीतर दुसऱ्या कसोटीतही भारताने विजय मिळवला असता. सध्याची टीम संतुलित असून संघात प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत. आपल्याकडे अनेक युवा क्रिकेटपटू आहेत जे चांगला खेळ करताहेत. भारतीय क्रिकेटमधील ही चांगली गोष्ट आहे. भारतीय क्रिकेटची प्रगती योग्य दिशेने होत असल्याचे,' श्रीकांत यांनी यावेळी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.