शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होणार टीम इंडियाची निवड

बीसीसीआयची निवड समिती १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी येत्या शनिवारी बैठक घेणार असून त्यात दौऱ्यासाठी टीमची निवड करणार आहे. 

Updated: Dec 17, 2015, 10:43 PM IST
शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होणार टीम इंडियाची निवड  title=

नवी दिल्ली : बीसीसीआयची निवड समिती १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी येत्या शनिवारी बैठक घेणार असून त्यात दौऱ्यासाठी टीमची निवड करणार आहे. 

बीसीसीआयने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार येत्या १९ डिसेंबर रोजी दिल्लीच्या आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. यात ऑस्ट्रेलियातील आगामी पाच वन डे आणि तीन टी २० मॅचसाठी दौऱ्यासाठी टीमची निवड करण्यात येणार आहे. 

सिरीजचे वेळापत्रक 

वनडे सीरीज

12 जानेवारी - पहिली वनडे

पर्थ 15 जानेवारी - दुसरी  वनडे

ब्रिसबेन 17 जानेवारी - तिसरी वनडे

मेलबर्न 20 जानेवारी - चौथी वनडे

कैनबरा 23 जानेवारी : पांचवी वनडे

सिडनी टी20 मॅच  

26 जानेवारी : पहिली टी20

एडीलेड ओवल 29 जानेवारी : दुसरी टी20

मेलबर्न 31 जानेवारी : तिसरी टी20