इंग्लंडचा पहिला डाव 400 धावांवर संपुष्टात

वानखेडे स्टेडियमवरील भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 400 धावांत आटोपलाय.

Updated: Dec 9, 2016, 12:44 PM IST
इंग्लंडचा पहिला डाव 400 धावांवर संपुष्टात title=

मुंबई : वानखेडे स्टेडियमवरील भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 400 धावांत आटोपलाय.

इंग्लंडने काल टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. इंग्लंडकडून पदार्पण करणाऱ्या कीटोन जेनिंग्न्सने 112 धावांची खेळी केली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतक झळकावले. 

जोस बटलरनेही 76 धावा झळकावल्या. जोस आणि जेनिंग्न्सच्या जबरदस्त खेळीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात 400 धावांचा पल्ला गाठता आला. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या.

तर रवींद्र जडेजाने चार विकेट घेत गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत सध्या 2-0 ने आघाडीवर आहे. हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याच्या दृष्टीने भारताला पहिल्या डावात मोठी खेळी करणे गरजेचे आहे.