500व्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय

भारताने 500व्या कसोटीत शानदार विजय मिळवलाय. 

Updated: Sep 26, 2016, 04:50 PM IST
500व्या कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय title=

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने ऐतिहासिक विजय मिळवलाय. न्यूझीलंडला भारताने तब्बल 197 धावांनी हरवले.

या विजयात मोलाची भूमिका बजावली ती आर. अश्विनने. शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत न्यूझीलंडला 236 धावांत रोखले. 

आर. अश्विनने संपूर्ण सामन्यात मिळून एकूण 10 विकेट घेतल्या. भारताच्या विजयात अश्विनची ही कामगिरी महत्त्वपूर्ण ठरलीये. या विजयासह भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-0ने आघाडी घेतलीये. 

पाहा लाईव्ह स्कोरकार्ड