क्रिकेटर रवींद्र जडेजाला लग्नापूर्वी सासऱ्याने दिलं ऑडी कार गिफ्ट

भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा १७ एप्रिलपासून आपल्या आयुष्यातील नवी इनिंग खेळण्यासाठी लग्नाच्या मैदानात उतरणार आहे. 

Updated: Apr 4, 2016, 10:59 PM IST
क्रिकेटर रवींद्र जडेजाला लग्नापूर्वी सासऱ्याने दिलं ऑडी कार गिफ्ट  title=

वडोदरा : भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजा १७ एप्रिलपासून आपल्या आयुष्यातील नवी इनिंग खेळण्यासाठी लग्नाच्या मैदानात उतरणार आहे. 

पण या लग्नापूर्वीच त्याच्या सासऱ्याने त्याला एक चमचमती ऑडी कार भेट म्हणून दिली आहे. 

रविंद्र जडेजा आपल्या भावी पत्नीसह कारची डिलीवरी घेण्यासाठी शो रूममध्ये गेला होता. 

असा सासरा सर्वांना मिळो....

रविंद्र जडेजाला ऑडी मिळाल्यावर पत्रकारांनी त्याला विचारले की सर्वत्र चर्चा आहे की असा सासरा सर्वांना मिळाला पाहिजे. त्यावर तो हसला आणि त्याने रिपोर्टरला हसू म्हटले असा ऑडी देणारा सासरा सर्वांना मिळाला पाहिजे. 

आता उघड करणार नाही लग्नाचा कार्यक्रमात

लग्नाचा कार्यक्रम आताच उघड करणार नसल्याचे जडेजाने स्पष्ट केले आहे. आताच जर सर्व सांगितले तर मजा राहणार नाही. 

गाडीवर विशेष क्रमांक 

गाडीचा क्रमांक १२१२ असा आहे. इंग्रजी मध्ये या RR असा दिसेल म्हणजे रविंद्रचा R आणि रिवाचा R