आयपीएल-८ची रंगारंग सुरूवात, पावसामुळं कार्यक्रमात कमतरता

'आयपीएल-८'ची साल्टलेकमधील युवा भारती मैदानात मंगळवारी रात्री रंगारंग सुरूवात झाली. कार्यक्रम सुरूवातीला ७ वाजता सुरू होणार होता. मात्र पावसामुळं हा कार्यक्रम उशीरानं सुरू झाला. उद्घाटन सोहळल्याला बॉलिवूडचा सुपरमॅन हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर आणि शाहिद कपूरनं आपला जलवा बिखेरला. 

PTI | Updated: Apr 9, 2015, 06:29 PM IST
आयपीएल-८ची रंगारंग सुरूवात, पावसामुळं कार्यक्रमात कमतरता title=

कोलकाता: 'आयपीएल-८'ची साल्टलेकमधील युवा भारती मैदानात मंगळवारी रात्री रंगारंग सुरूवात झाली. कार्यक्रम सुरूवातीला ७ वाजता सुरू होणार होता. मात्र पावसामुळं हा कार्यक्रम उशीरानं सुरू झाला. उद्घाटन सोहळल्याला बॉलिवूडचा सुपरमॅन हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर आणि शाहिद कपूरनं आपला जलवा बिखेरला. 

कार्यक्रमाचं अँकरींग अभिनेता सैफ अली खाननं केलं. त्यानं आठ टीमच्या कॅप्टनला स्टेजवर बोलवलं. यानंतर एक-एक करून प्रत्येक कॅप्टननं बॅटवर सही केली. 

रंगारंग कार्यक्रमाची सुरूवात अभिनेता शाहीद कपूरनं फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये बाईकवर येऊन केली. त्यानंतर अनुष्का शर्मानं कार्यक्रमात भर टाकली. अनुष्काच्या नृत्यावर विराटच्या रिअॅक्शनही पाहण्या लायक होत्या. कारण अनुष्काचा परफॉर्मन्स बघायला विराट व्हीव्हीआयपी बॉक्समध्ये आला होता. अनुष्का स्टेजवर येताच 'कोहली कोहली'च्या घोषणा सुरू झाल्या होत्या. 

त्यानंतर अभिनेता फरहान अख्तरनं आपल्या रॉक बँडसह प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. फरहाननं रॉक गाणी गायली. त्यात 'सेनोरिटा' तरुणांना खूप आवडलं. तर अभिनेते हृतिक रोशननं आपली पहिली 'फिल्म कहो ना प्यार है'चं एक पल का जीना या गाण्यावर दमदार नृत्य सादर केलं. याशिवाय इधर चल मैं उधर चला, धूम मचा दे या गाण्यांवरही त्यानं परफॉर्मन्स दिला. 

पावसामुळं कार्यक्रम उशीरा सुरू झाल्यानं २०१३, २०१४ सारखा तो सुपर झाला नाही. आता आज संध्याकाळी ८ वाजता कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स पहिली मॅच रंगणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.