दिल्ली डेअरडेविल्सला मोठा झटका, क्विंटन डी कॉक आयपीएलमधून बाहेर

आयपीएलचा 10 वा हंगाम सुरु होण्याआधीच दिल्ली डेअरडेविल्सला मोठा झटका बसलाय. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू क्विंटन डी कॉक दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीये.

Updated: Mar 24, 2017, 10:45 PM IST
दिल्ली डेअरडेविल्सला मोठा झटका, क्विंटन डी कॉक आयपीएलमधून बाहेर title=

नवी दिल्ली : आयपीएलचा 10 वा हंगाम सुरु होण्याआधीच दिल्ली डेअरडेविल्सला मोठा झटका बसलाय. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू क्विंटन डी कॉक दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीये.

ईएसपीएनक्रिकइन्फो डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, डी कॉकला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. दरम्यान न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळणार असला तरी मात्र आयपीएलच्या दहाव्या मोसमात तो खेळू शकणार नाहीये.

क्विंटन डी कॉकला दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी कमीत कमी चार आठवडे लागणार आहेत. त्यामुळे बोर्डाने डी कॉकला आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचा सल्ला दिलाय.