आयपीएल-8: खेळाडूंचा एक-एक रन लाखांच्या घरात!

आयपीएल-८मध्ये युवराज सिंग, दिनेश कार्तिक, अॅजिंलो मॅथ्युजसारख्या खेळाडूंची एक-एक रन टीमला लाखो रुपयांना पडला आहे. तसंच जलद गोलंदाज जहीर खाननं घेतलेल्या विकेट्सही लाखो रुपयांना पडल्या आहेत. 

Updated: May 18, 2015, 04:46 PM IST
आयपीएल-8: खेळाडूंचा एक-एक रन लाखांच्या घरात! title=

मुंबई: आयपीएल-८मध्ये युवराज सिंग, दिनेश कार्तिक, अॅजिंलो मॅथ्युजसारख्या खेळाडूंची एक-एक रन टीमला लाखो रुपयांना पडला आहे. तसंच जलद गोलंदाज जहीर खाननं घेतलेल्या विकेट्सही लाखो रुपयांना पडल्या आहेत. 

रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरूचा विकेट कीपर दिनेश कार्तिकला खेळाडूंच्या निलामीत १०.५ कोटींना खरेदी करण्यात आलं होतं. मात्र कार्तिकने १४ सामन्यांत केवळ १०५ रन्सच केल्या. अशा प्रकारे कार्तिकचा प्रत्येक रन सर्वात महाग म्हणजे १० लाखांना पडला आहे. 

आयपीएलचा सर्वात महाग खेळाडू युवराज सिंगनंही १४ सामन्यात २४८ रन्सच केल्या. त्यामुळं त्याचा प्रत्येक रन ६.४५ लाखांना पडला आहे. तसंच अॅजिंलो मॅथ्युज ११ सामन्यांत १४४ रन्सच केल्या. त्यामुळं त्याचा प्रत्येक रन ५.२० लाखांना पडला आहे. 

जहीर खानला दिल्लीनं चार कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. मात्र दुखापतीमुळे जहीर सातच सामन्यांत खेळू शकला. या सात सामन्यांत जहीरनं ७ विकेट घेतल्या. त्यामुळे जहीरची प्रत्येक विकेट ५७.१४ लाखांना पडली आहे. 

रविंद्र जडेजाला ९.८ कोटींना खरेदी करण्यात आलं, त्याने १०२ रन्स केले. त्यामुळे त्याची प्रत्येक रन ९.६ लाखांना पडला आहे. ग्लेन मॅक्सवेलला ६ कोटींना खरेदी करण्यात आलं होत, त्याने केवळ १४५ रन्स केल्. त्यामुळे त्याची प्रत्येक रन ४.१ लाखांना पडला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.