...पप्पा बनणार महेंद्र सिंह धोनी!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या फॅनसाठी एक खुशखबर... धोनीच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. इंग्रजी वृत्तपत्र द इकॉनॉमिक टाइम्सने सर्वात प्रथम ही बातमी दिली आहे. 

Updated: Nov 28, 2014, 02:14 PM IST
...पप्पा बनणार महेंद्र सिंह धोनी! title=

रांची : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या फॅनसाठी एक खुशखबर... धोनीच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. इंग्रजी वृत्तपत्र द इकॉनॉमिक टाइम्सने सर्वात प्रथम ही बातमी दिली आहे. 

बातमीनुसार ही माहिती वृत्तपत्राला टीम इंडियातील निकटवर्तीय सूत्राने दिली आहे. हा व्यक्ती अनेक खेळाडूंचा मार्केटिंग एजंट आहे. बातमी अशी की साक्षी प्रेग्नंट असून तिला चौथा महिना सुरू आहे.

त्यामुळे पुढील वर्षी धोनीच्या घरी एका छोटा पाहुणा येणार आहे. या संदर्भात काही मीडियातील बातम्यांनुसार धोनी या वर्षाच्या अखेरीस वडील बनणार आहे. पण या वृत्तपत्राने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.