महाराष्ट्राच्या हिरकणीचा जिगरबाज परफॉर्मन्स!

चीनच्या बीजिंग शहरात महाराष्ट्राच्या हिरकणीनं आपल्या जिगरबाज परफॉर्मन्सनं साऱ्या भारतीयांची मान उंचावलीय.

Updated: Aug 27, 2015, 10:23 AM IST
महाराष्ट्राच्या हिरकणीचा जिगरबाज परफॉर्मन्स! title=

बीजिंग : चीनच्या बीजिंग शहरात महाराष्ट्राच्या हिरकणीनं आपल्या जिगरबाज परफॉर्मन्सनं साऱ्या भारतीयांची मान उंचावलीय.

साताऱ्याच्या ललिता बाबर आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ३००० मीटर स्टिपल चेस शर्यतीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवून इतिहास रचलाय. ललिताला या स्पर्धेत पदक कमावता आलेलं नाही. पण, तिच्या जिगरबाज परफॉरमन्स उपस्थितांची मनं जिंकली.

विशेषतः भारतीय टीमचा उत्साह वाढवण्यासाठी ललिताच्या या परफॉर्मन्सनं मोठा हातभार लावलाय. एकूण १५ जणींनी फायनलमध्ये धडक मारली होती. ललितानं सोमवारी झालेल्या क्वालिफायिंग राऊंडमध्ये या आधीचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला होता. त्यामुळे तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. 

एकूण ८ फेऱ्यांच्या अंतिम शर्यतीतल्या ६ फेऱ्या जगातल्या सर्व धावपटूंच्या जवळपास २० ते ३० मीटर पुढे धावत होती. पण, सातव्या फेरीत उडी मारताना तिचा अंदाज चुकला आणि ती मागे पडली. पण ललितानं धीर सोडला नाही. ३००० हजार मीटरची स्टिपल चेस तिनं ९ मिनिट २९ सेकंद आणि ६४ मिली सेकंदात पूर्ण केली.

आशियाई स्पर्धेची सुवर्णपदक विजेती धावपटू रॉट जेबेटला तिनं या स्पर्धेत मागे टाकलं. भारताची आणखी एक धावपटू टिंटू लुका या अंतिम फेरीत स्थान मिळवू शकली नव्हती. त्यामुळे भारतीय टीममध्ये नाराजी होती. पण ललितानं आपल्या दमदार परफॉर्ममन्सनं सगळ्याच टीमला नवी उभारी दिल्याचं तिच्या कोचनं या शर्यतीनंतर म्हटलंय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.