पहिला बांगलादेशी, त्याने केली वर्ल्डकप सेंच्युरी

 महमुदुल्लाह याने इंग्लंड विरूद्ध सेंच्युरी झळकावून बांगलादेशसाठी एक इतिहास रचला आहे. वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात सेंच्युरी झळकविणारा तो पहिला बांगलादेशी ठरला आहे. 

Updated: Mar 9, 2015, 02:42 PM IST
पहिला बांगलादेशी, त्याने केली वर्ल्डकप सेंच्युरी  title=

अॅडलेड :  महमुदुल्लाह याने इंग्लंड विरूद्ध सेंच्युरी झळकावून बांगलादेशसाठी एक इतिहास रचला आहे. वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात सेंच्युरी झळकविणारा तो पहिला बांगलादेशी ठरला आहे. 

महमुदुल्लाह याच्या शानदार १०३ धावांच्या जोरावर बांगलादेशने इंग्लंडसमोर २७५ धावांचे आव्हान ठेवले आहे. ८ धावांवर दोन विकेट पडल्यावर तो मैदानात आला होता. अत्यंत बिकट परिस्थितीत त्याने सुरूवातीला सौम्या सरकार यांच्या मदतीने ८६ धावांची भागिदारी करत डावाला आकार दिला. त्यानंतर मुश्किफूर रेहमानच्या साथीने १४१ धावांची भागिदारी केली आणि बांगलादेशला २७५ धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात मदत केली. 
मुश्कीफूर आणि महमुदुल्लाह यांची भागिदारी ही बांगलादेशासाठी वर्ल्ड कपमधील रेकॉर्ड पार्टनरशीप ठरली आहे. 

यापूर्वी तमीम इक्बाल याने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ९५ धावा केल्या होत्या. त्याने या स्पर्धेत स्कॉटलंड़ विरूध्द ही कामगिरी केली होती. 

पाहा व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.