लसिथ मलिंगा आयपीएलमधून आऊट

श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. 

Updated: Apr 17, 2016, 05:55 PM IST
लसिथ मलिंगा आयपीएलमधून आऊट title=

मुंबई: श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. आपल्या भात्यातलं प्रमुख अस्त्र असलेला मलिंगा आयपीएलमधून आऊट होणं मुंबईसाठी मोठा धक्का आहे. 

मुंबई इंडियन्सच्या मेडिकल टीमनं मलिंगाला पुढचे 4 महिने खेळण्यासाठी अनफिट ठरवलं आहे. त्यामुळे मलिंगा श्रीलंकेचा आगामी इंग्लंड दौरा आणि कॅरेबियन प्रिमियर लीगलाही मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर मलिंगाची तपासणी करणार आहेत, आणि त्याच्या गुडघ्याच्या ऑपरेशनची गरज आहे का नाही याबाबतचा निर्णय घेणार आहेत. 

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना मलिंगाच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर गेल्या 5 महिन्यांमध्ये मलिंगा फक्त एक आंतरराष्ट्रीय मॅच खेळला आहे. याच दुखापतीमुळे मलिंगाला आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कप खेळता आला नव्हता.