पी व्ही सिंधू ठरली 'मोस्ट इम्प्रुव्ह्ड प्लेअर'

ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी. व्ही. सिंधूसाठी 2016 चं वर्ष खऱ्या अर्थान गोल्डन ईयर ठरलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 13, 2016, 02:03 PM IST
पी व्ही सिंधू ठरली 'मोस्ट इम्प्रुव्ह्ड प्लेअर' title=

दुबई : ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी. व्ही. सिंधूसाठी 2016 चं वर्ष खऱ्या अर्थान गोल्डन ईयर ठरलंय.

सिंधूला बीडब्ल्यूएफ अर्थात बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या पुरस्कार सोहळ्यात 'मोस्ट इम्प्रुव्हड् प्लेअर' अॅवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. 

दुबईत झालेल्या रंगतदार सोहळ्याच तिला हा पुरस्कार प्रदान कऱण्यात आला. सिंधूनं 2016 मध्ये ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल पटकावलं. तर चायना ओपन सुपरसिरीज जिंकत तिनं आपल्या बॅडमिंटन करिअरमधील पहिल्या सुपरसिरीज खिताबावर आपलं नाव कोरलं. आता सीझनमधील अखेरच्या वर्ल्ड सुपरसिरीज फायनल्समध्ये ती भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे.