विराटची विकेट घेतल्यानंतर गेला रुबेलचा तोल!

 भारताचा धुरंधर क्रिकेटर क्रिकेटर विराट कोहली आज बांग्लादेशविरुद्धच्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये केवळ तीन रन्सवर आऊट झाला. विराटला आऊट केल्यानंतर बांग्लादेशी बॉलर रुबेल हुसैन यानं मात्र जोशमध्ये येऊन खुन्नसमध्ये विराटसाठी अपशब्द वापरले. त्यामुळे, एक नवा वाद उभा राहिलाय. 

Updated: Mar 19, 2015, 02:16 PM IST
विराटची विकेट घेतल्यानंतर गेला रुबेलचा तोल! title=

मेलबर्न :  भारताचा धुरंधर क्रिकेटर क्रिकेटर विराट कोहली आज बांग्लादेशविरुद्धच्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये केवळ तीन रन्सवर आऊट झाला. विराटला आऊट केल्यानंतर बांग्लादेशी बॉलर रुबेल हुसैन यानं मात्र जोशमध्ये येऊन खुन्नसमध्ये विराटसाठी अपशब्द वापरले. त्यामुळे, एक नवा वाद उभा राहिलाय. 

विराटला आऊट केल्यानंतर रुबेलला जणू आकाशच ठेंगणं झालं. विराटची विकेट घेणं हे विरोधी टीमसाठी अत्यावश्यकच होतं, हे मान्य पण, रुबेलचा विराटला बाद केल्यानंतरचा तोरा पाहण्यासारखा होता.... हाच त्याचा वादग्रस्त अंदाज चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरलाय.

रुबेल १७ वी ओव्हर फेकत होता. ओव्हरच्या पाचव्या बॉलला विराट कोहलीनं ड्राइव्ह घेतली पण, टोकाला लागल्यानं बॉल सरळ विकेटकीपर मुशफिक्कुर रहीमच्या हातात जाऊन पडला. यामुळे, विराट मात्र पुरता निराश झाला. 

याच दरम्यान रुबेल हुसैननं आपल्या सहकाऱ्यांसोबत मैदानातून परतणाऱ्या विराटकडे पाहून काही अपशब्द उच्चारले. परंतु, निराश विराट रुबेलला जराही महत्त्व न देता पॅव्हेलियनकडे वळला. 

रुबेलच्या या वागण्यावरून, कमेंट्री पॅनलमध्ये असणाऱ्या आकाश चोपडा आणि शोएब अख्तर यांनीही नाराजी व्यक्त केली. 'अगोदर विकेट मिळालं की बॉलर खुश होत होता पण आता मात्र परिस्थिती बदलललीय. बॉलर विकेट घेतल्यानंतर घाणेरड्या कमेंटस् करणं विसरत नाहीत' असं त्यांनी यावेळी म्हटलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.