सचिन तेंडुलकरला मिस्ड कॉल दिल्यावर येतो फोन!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मिस्ड कॉल दिला की सचिन कॉल करतो. ऐकून जरा आश्चर्य वाटलं ना!

Updated: Apr 3, 2015, 07:19 PM IST
सचिन तेंडुलकरला मिस्ड कॉल दिल्यावर येतो फोन! title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मिस्ड कॉल दिला की सचिन कॉल करतो. ऐकून जरा आश्चर्य वाटलं ना!
पण हे खरं आहे. हे सांगितलयं सचिनचा सर्वात मोठा फॅन सुधीर कुमार गौतमने. एका एफ एम चॅनलला दिलेल्या इंटरव्हिवमध्ये त्याने या गोष्टींचा खुलासा केला आहे.

मी कधी अडचणीत असेल तर मी सरांना कॉल करतो. तेव्हा सर माझा कॉल कट करून स्वत: मला पुन्हा मला कॉल करतात, असे  सुधीरने सांगितले आहे.

मी सरांच्या घरी कधीही जाऊ शकतो. मला सरांच्या घरात जाण्यापासून कोणीही आडवत नाही. ऑकलंड विमानतळावर माझ्या बॅगमध्ये अर्ध खाल्लेलं सफरचंद आणि पेंट रिमुव्हर सापडल्यामुळे मला कस्टम डिपार्टमेंटने ४०० डॉलरचा दंड ठोठावला. मात्र सचिन सरांच्या पत्रामुळे माझी सुखरूप सुटका झाली होती. सरांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, असे तो सांगतो.

भारताचा सामना असेल त्या दिवशी माझा उपवास असतो. दिवसभर मी फक्त चहा, पाणी आणि ज्यूस पितो. पूर्ण दिवस मी तिरंगा फडकवतो आणि शंख वाजवतो. मी आजवर २५२ वन डे, ४२ कसोची सामने, ६३ आयपीएल आणि चॅपियन्स लीगचे सामने,  ३२ टी-20 आणि ३ रणजी ट्रॉफी सामने पाहिले आहेत.' असे सुधीलने सांगितले.

मी कधीही लग्न करणार नाही. मी सरांना देव मानलं आहे. मी जेव्हा सामना पहायला मैदानात जाईल तेव्हा माझ्या शरिरावर सचिन सरांचं नाव लिहीलेलं असेल. त्यामुळे जोपर्यंत मी आहे सचिन सर मैदानात दिसतील, असेही सुधीरने सांगितले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.