फोटो : 'कॅप्टन कूल' लवकरच शिरतोय पित्याच्या भूमिकेत

भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून आपला ताण हलका केला असला तरी त्याला काही फार उसंत मिळणार नाहीय... कारण, लवकरच तो वडिलांच्या भूमिकेत शिरतोय.

Updated: Jan 16, 2015, 11:18 AM IST
फोटो : 'कॅप्टन कूल' लवकरच शिरतोय पित्याच्या भूमिकेत title=

मुंबई : भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून आपला ताण हलका केला असला तरी त्याला काही फार उसंत मिळणार नाहीय... कारण, लवकरच तो वडिलांच्या भूमिकेत शिरतोय.


साक्षी धोनी

होय, धोनीनं कधीही याबद्दल कुठेही वाच्यता केलेली नसली तरी त्याची पत्नी साक्षी धोनी हिचा एक फोटो सध्या सोशल वेबसाईटवर व्हायरल झालाय. या फोटोमध्ये साक्षी धोनी प्रेग्नंट असल्याचं तिच्या बेबी बंपवरून लगेच लक्षात येतंय.

या फोटोवरून धोनी लवकरच 'बाबा' होणार असल्याचं त्यांच्या चाहत्यांनाही कळलंय. महेंद्रसिंग धोनी आणि साक्षीचा विवाह ४ जुलै २०१० रोजी झाला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.