सानिया-मार्टिनाचा सलग ३०वा विजय, सिडनी टेनिस स्पर्धेचे जेतेपद

सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत टेनिस दुहेरीतील अव्वल मानांकित जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या वर्षातील दुसऱ्या आणि एकूण ११व्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तसेच या जोडीने सलग ३० सामन्यात अपराजित राहण्याचा नवा विश्वविक्रम नोंदवला. 

Updated: Jan 16, 2016, 08:53 AM IST
सानिया-मार्टिनाचा सलग ३०वा विजय, सिडनी टेनिस स्पर्धेचे जेतेपद title=

सिडनी : सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवत टेनिस दुहेरीतील अव्वल मानांकित जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या वर्षातील दुसऱ्या आणि एकूण ११व्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तसेच या जोडीने सलग ३० सामन्यात अपराजित राहण्याचा नवा विश्वविक्रम नोंदवला. 

या जोडीने प्युर्टो रिकोच्या गिगी फर्नांडिस आणि बेलारुसच्या नताशा जवेरा जोडीचा २८ सामन्यांत सलग विजय मिळवण्याचा रेकॉर्डही मोडला. या दोघांनी गेल्याच आठवड्यात ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचे जेतेपद जिंकले होते. 

सिडनी टेनिस स्पर्धेतही त्यांची दमदार फॉर्म कायम राखताना यंदाच्या वर्षातील सलग दुसऱ्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्यात त्यांनी रोमानियाच्या रालूका ओलारो आणि कझाकस्तानच्या यारास्लोव्हा श्वेडोवा जोडीला ४-६, ६-३, १०-८ असे नमवले.