सेहवागनं आता अजित आगरकरची उडवली खिल्ली

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सध्या त्याची कॉमेंट्री आणि ट्विटमुळे चर्चेत आहे.

Updated: Dec 4, 2016, 06:53 PM IST
सेहवागनं आता अजित आगरकरची उडवली खिल्ली title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग सध्या त्याची कॉमेंट्री आणि ट्विटमुळे चर्चेत आहे. आता सेहवागच्या रडारवर भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकर आला आहे. वाढदिवसानिमित्त सेहवागनं अजित आगरकरची खिल्ली उडवली आहे.

191 वनडेमध्ये 288 विकेट म्हणजे मोठी कामगिरी, लॉर्ड्स टेस्टवर सेंच्युरी म्हणजे आणखी मोठी कामगिरी आणि टेस्ट मॅचमध्ये सलग पाचवेळा शून्यवर आऊट म्हणजे सर्वात मोठी कामगिरी असा टोला सेहवागनं आगरकरला लगावला आहे.