नागपूर पिचच्या टीकाकारांवर शास्त्री भडकले

भारतीय टीमचे निर्देशक रवी शास्त्री यांनी नागपूर पिचवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. वन-डे सामन्यांमुळे रन बनवण्याच्या कलेचं पतन होत चालल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. टीम इंडियाने नागपूरमध्ये कसोटी सामन्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा डाव ७९ रन्सने गुंडाळला होता. तर जगभरातील टीकाकारांनी आणि माजी क्रिकेटर्सने सोशल मीडियावर व्हीसीए स्टेडियमच्या पिचवर जोरदार टीकास्त्र डागलं होतं. 

Updated: Nov 30, 2015, 12:23 AM IST
नागपूर पिचच्या टीकाकारांवर शास्त्री भडकले title=

नागपूर : भारतीय टीमचे निर्देशक रवी शास्त्री यांनी नागपूर पिचवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. वन-डे सामन्यांमुळे रन बनवण्याच्या कलेचं पतन होत चालल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. टीम इंडियाने नागपूरमध्ये कसोटी सामन्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा डाव ७९ रन्सने गुंडाळला होता. तर जगभरातील टीकाकारांनी आणि माजी क्रिकेटर्सने सोशल मीडियावर व्हीसीए स्टेडियमच्या पिचवर जोरदार टीकास्त्र डागलं होतं. 

यावर बोलताना रवी शास्त्री म्हणाले होते, कसोटी सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिचमध्ये कोणतीही खराबी नाहीय, आपण पिचला दोष देऊ शकत नाही, वनडे सामन्यांमुळे पिचवर जास्तवेळ थांबण्याची बॅटसमनची सवय कमी होत आहे. याआधीही अशा पिचवर खेळाडू तासंनतास खेळत असतं, संयमाने ते बॅटिंग करत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.