बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूची क्रमवारीत सातव्या स्थानी झेप

रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेतील पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी झेप घेतलीये.

Updated: Dec 2, 2016, 09:45 AM IST
बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूची क्रमवारीत सातव्या स्थानी झेप title=

नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेतील पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी झेप घेतलीये.

चायना ओपनचे जेतेपद त्यानंतर हाँगकाँग ओपनमध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या सिंधूंच्या क्रमवारीत दोन स्थानांनी सुधारणा होत ती सातव्या स्थनी पोहोचलीये. 

यासोबतच तिने वर्षाअखेरीस होणाऱ्या सुपरसिरीज फायनलमध्ये जागा पक्की केलीये. क्रमवारीत पहिल्या आठ स्थानावर असणाऱ्या खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेता येतो. 14 ते 18 डिसेंबरदरम्यान दुबईत ही स्पर्धा होईल. 

रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती स्पेनची कॅरोलिन मरिन पहिल्या स्थानावरुन घसरुन दुसऱ्या स्थानी आलीये. हाँगकाँग ओपनचे जेतेपद मिळवणारी चीन तैपेईची तै त्झू यिंगने पहिले स्थान पटकावलेय. थायलंडची रत्नचोक इंटनान तिसऱ्या स्थानी आहे.