सिंधूला हाँगकाँग ओपनचं उपविजेतेपद

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूला हाँगकाँग ओपनच्या फायनलमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

Updated: Nov 27, 2016, 04:07 PM IST
सिंधूला हाँगकाँग ओपनचं उपविजेतेपद  title=

कोलून: भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूला हाँगकाँग ओपनच्या फायनलमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवामुळे सिंधूचं सलग दुस-यांदा सुपरसिरीज जिंकण्याचं स्वप्न भंग पावलं. फायनलमध्ये सिंधूला चायनीज तैपईच्या ताई-त्झू-यिंगनं 21-15, 21-17 अशा सलग दोन गेममध्ये पराभूत केलं.

सिंधूनं फायनल जिंकण्यासाठी कडवा संघर्ष केला पण तिचे सारे प्रयत्न अपुरे पडले. चायनीज ओपन जिंकल्यानंतर सिंधू बॅडमिंटन सीझनमधील अखेरची हाँगकाँग ओपन सुपरसिरीजही जिंकेल अशी अपेक्षा होती. मात्र, तिला फायनलमध्ये पराभव सहन करावा लागला.