पी.व्ही.सिंधूनं सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स गोल्डवर कोरलं आपलं नाव

ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी.व्ही.सिंधूनं आपल्या बॅडमिंटन करिअरमध्ये पहिल्यांदाच सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स गोल्डवर आपलं नाव कोरलं. तिनं मरिस्कावर 21-13, 21-14 नं मात केली. फायनलच्या लढतीत सुरुवातीपासूनच सिंधूनं आपली पकड मजबूत केली होती. 

Updated: Jan 30, 2017, 09:44 AM IST
पी.व्ही.सिंधूनं सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स गोल्डवर कोरलं आपलं नाव title=

मुंबई : ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी.व्ही.सिंधूनं आपल्या बॅडमिंटन करिअरमध्ये पहिल्यांदाच सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स गोल्डवर आपलं नाव कोरलं. तिनं मरिस्कावर 21-13, 21-14 नं मात केली. फायनलच्या लढतीत सुरुवातीपासूनच सिंधूनं आपली पकड मजबूत केली होती. 

मरिस्काचं सिंधूच्या धडाक्यापुढे काहीच चाललं नाही. सिंधूनं सय्यद मोदी टुर्नामेंट जिंकत आपल्या विजेतेपदांमध्ये आणखी एका विजेतेपदाची भर घातली आहे. आता आगामी टुर्नामेंट्समध्ये सिंधूकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.