ऑस्ट्रेलियावर नामुष्की, दक्षिण आफ्रिकेकडून व्हाईटवॉश

2015 चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेनं व्हाईट वॉश केलं आहे.

Updated: Oct 13, 2016, 05:37 PM IST
ऑस्ट्रेलियावर नामुष्की, दक्षिण आफ्रिकेकडून व्हाईटवॉश title=

केपटाऊन : 2015 चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेनं व्हाईट वॉश केलं आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेली ही वनडे मालिका आफ्रिकेनं 5-0नं जिंकली आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त मॅच असलेली वनडे सीरिज 5-0नं गमावण्याची ऑस्ट्रेलियाची ही पहिलीच वेळ आहे.

केपटाऊनमध्ये झालेल्या पाचव्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 50 ओव्हरमध्ये 327 रन केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून रायली रुसोनं 122 तर जे.पी.डुमनीनं 73 रनची खेळी केली. 328 रनचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर वगळता ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या कोणत्याच बॅट्समनला चमकदार कामगिरी दाखवता आली नाही. डेव्हिड वॉर्नरनं 136 बॉलमध्ये 173 रनची अफलातून खेळी केली, पण वॉर्नरच्या या खेळीनंतरही ऑस्ट्रेलियाला पराभव टाळता आला नाही.