व्हिडिओ : श्रीलंकेचा हा खेळाडू करतो दोन्ही हातांनी बॉलिंग

 भारताचा अक्षय कर्णेवार हा देशांतर्गत स्पर्धेत दोन्ही हातांनी गोलंदाजी करताना आपण पाहिला. पण आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर अंडर १९ क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेच्या कामिन्डू मेंडिस हा अशी आश्चर्यकारक गोलंदाजी करत आहे. 

Updated: Feb 3, 2016, 05:33 PM IST
व्हिडिओ : श्रीलंकेचा हा खेळाडू करतो दोन्ही हातांनी बॉलिंग  title=

ढाका :  भारताचा अक्षय कर्णेवार हा देशांतर्गत स्पर्धेत दोन्ही हातांनी गोलंदाजी करताना आपण पाहिला. पण आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर अंडर १९ क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेच्या कामिन्डू मेंडिस हा अशी आश्चर्यकारक गोलंदाजी करत आहे. 

(खाली गोलंदाजीचा व्हिडिओ आहे)

सध्या बांग्लादेशात सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्ड कप सामन्यात श्रीलंकेचा क्रिकेटर कामिन्डू मेंडिस हा दोन्ही हातांनी गोलंदाजी करताना दिसला. तो डाव्या हातानेही स्पिन गोलंदाजी करतो आणि उजव्या हातानेही ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. 

पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात तो ही कमालीची गोलंदाजी करताना दिसला. श्रीलंकेसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणारा मेंडिस दोन्ही हातांनी गोलंदाजी करतो पण लाइन अँड लेन्थ आणि शिस्त दोन्ही हातांनी कायम ठेवतो. 

त्याला या सामन्यात कोणतीही विकेट मिळाली नाही, पण त्याने चार ओव्हर्समध्ये २१ धावा दिल्या. 

पाहा हा अद्भूत व्हिडिओ 

 

 

The ambidextrous Kamindu Mendis

Posted by Cricket Videos on Tuesday, February 2, 2016