बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त

बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी समिती सुप्रीम कोर्टानं चार सदस्यीय समितीची नियुक्ती केलीय. 

Updated: Jan 30, 2017, 04:39 PM IST
बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त title=

नवी दिल्ली : बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी समिती सुप्रीम कोर्टानं चार सदस्यीय समितीची नियुक्ती केलीय. या प्रशासकीय समितीचे प्रमुख म्हणून माजी कॅग विनोद राय यांची नियुक्ती करण्यात आलीय, त्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून विनोद राय हे काम पाहतील. 

याशिवाय इतिहासकार रामचंद गुहा, आयडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम लिमये आणि महिला भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार डायना एडुलजी यांचाही या समितीत समावेश आहे. हे चार सदस्य आता बीसीसीआयचा कारभार पाहतील, त्यामुळे आयसीसीच्या बैठकांनाही हे सदस्य उपस्थित राहतील.