रैनाचा पत्नी प्रियांका सोबतचा पहिला सेल्फी!

भारताच्या क्रिकेट टीमचा स्टार प्लेअर सुरेश रैनानं ३ एप्रिलला प्रियंका चौधरीसोबत विवाह केला. रैनानं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रियांकासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

Updated: Apr 9, 2015, 01:35 PM IST
रैनाचा पत्नी प्रियांका सोबतचा पहिला सेल्फी! title=

नवी दिल्ली : भारताच्या क्रिकेट टीमचा स्टार प्लेअर सुरेश रैनानं ३ एप्रिलला प्रियंका चौधरीसोबत विवाह केला. रैनानं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रियांकासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

रैनाला संपूर्ण देश ओळखतो. मात्र आता संर्वांना उत्सुकता आहे प्रियंकाबद्दलची माहिती जाणून घ्यायची.

प्रियंका नेदरलॅंडमधील एका खाजगी बॅंकेत नोकरीला आहे. तर प्रियंकाचं कुटुंबीय मेरठचे रहिवाशी आहेत. ८ एप्रिलपासून सुरु झालेल्या आयपीएलमध्ये रैना आता सहभाग घेणार आहे. रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स टीमकडून खेळतो.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.