पुरुषांशी मॅच खेळणारी 'महिला बॉक्सर'...

‘ग्लासगो कॉमनवेल्थ 2014’ च्या निमित्तानं अशा काही कहाण्या समोर येतायत ज्या अनेकांना विचार करायला भाग पाडत आहेत... अशीच एक कहाणी आहे एका महिला बॉक्सरची... 

Updated: Jul 31, 2014, 03:50 PM IST
पुरुषांशी मॅच खेळणारी 'महिला बॉक्सर'...   title=
ग्लासगो कॉमनवेल्थ

ग्लासगो : ‘ग्लासगो कॉमनवेल्थ 2014’ च्या निमित्तानं अशा काही कहाण्या समोर येतायत ज्या अनेकांना विचार करायला भाग पाडत आहेत... अशीच एक कहाणी आहे एका महिला बॉक्सरची... 

या महिला बॉक्सरची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, तीनं ग्लासगो कॉमनवेल्थमध्ये सहभागी होण्यापूर्वी एकदाची दुसऱ्या एखाद्या महिलेसोबत बॉक्सिंगची मॅच खेळलेली नाही... तर तीनं नेहमीच पुरुषांशी दोन हात केलेत.  

या महिला बॉक्सरचं नाव आहे ताओरिबा बिन्याती... केवळ 18 वर्षांची बिन्याती ‘किरीबाती’ या बेटावरून ग्लासगो कॉमनवेल्थमध्ये सहभागी झालीय. ग्लासगोमध्ये पहिल्यांदाच तीनं प्रतिस्पर्धी महिला बॉक्सरबरोबर बॉक्सिंगची मॅच खेळली... आणि या ‘महिलांच्या लाइटवेट’ वर्गातील मॅचमध्ये तिला हार पत्करावी लागली.  

का खेळतेय बिन्याती पहिल्यांदाच महिलांसोबत मॅच... 
असं नाही की बिन्यातीला महिलांशी मॅच खेळण्याची इच्छा नाही... पण, तिला आत्तापर्यंत एकदाही महिला प्रतिस्पर्ध्यासोबत खेळण्याची संधीच मिळाली नाही. त्याचं कारण असं की बिन्याती ज्या छोट्या बेटावरून आलीय तिथं महिला बॉक्सरचं नाहीत... त्यामुळे, बिन्यातीला पुरुषांशी मॅच खेळण्याशिवाय पर्यायच नाही. 

‘किरीबाती’ हे प्रशांत महासागरातील एक बेटांचा समूह आहे... इथली लोकसंख्या जवळपास एक लाखांपर्यंत आहे.


ताओरिबा बिन्याती 

कशी आली बिन्याती बॉक्सिंगकडे... 
ब्रिटनचे माजी पोलीस अधिकारी डेरेक एन्ड्र्यूआर्था 47 वर्षांपूर्वी किरीबातीला गेले होते. त्यानंतर ते तिथंच स्थायिक झाले... आणि इथंच त्यांनी बॉक्सिंगला प्रेरणा दिली. 

या बेटावर, डेरेक यांच्या क्लबनं जाहीरात देऊनही एकही महिला बॉक्सिंगसाठी पुढे आली नव्हती. पण, काही दिवसांनी एक मंत्री महोद्य एका मुलीला घेऊन समोर त्यांच्यासमोर उपस्थित झाले... ही मुलगी म्हणजे बिन्याती... 

जुलै 2013 मध्ये बिन्यातीनं बॉक्सिंगचं प्रशिक्षण सुरु केलं. पण, तिथं दुसरी कोणतीही महिलाच नसल्यानं बिन्यातीला पुरुषांसोबत प्रशिक्षण घ्यावं लागतंय. 

डेरेक म्हणतात, ‘खरी मेख म्हणजे, बिन्यातीला मारण्यासाठी प्रतिस्पर्धी पुरुष लाजतात... त्यांनी तिला मारावं असं मला वाटतं... त्यामुळे ती मेहनत घेऊन खरंखुरं जिंकू शकेल’. 

ग्लासगोमध्ये झालेल्या पराभवानं बिन्याती दुखी आहे. पण, बिन्यातीला आता आशा वाटतेय, की किमान यापुढे तरी तिच्या देशातील आणखी मुली खेळांसाठी पुढे येतील.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.