पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडिया तिरंगा लावून खेळणार

इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-२० सामना उद्या २६ जानेवारीला होतोय. या सामन्यात भारतीय संघ तिरंगा लावून खेळू शकतो. उत्तर प्रदेश क्रिकेट संघ याप्रकरणी भारतीय संघाच्या व्यवस्थापकांशी चर्चा करेल.

Updated: Jan 25, 2017, 10:28 AM IST
पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडिया तिरंगा लावून खेळणार title=

कानपूर : इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-२० सामना उद्या २६ जानेवारीला होतोय. या सामन्यात भारतीय संघ तिरंगा लावून खेळू शकतो. उत्तर प्रदेश क्रिकेट संघ याप्रकरणी भारतीय संघाच्या व्यवस्थापकांशी चर्चा करेल.

आयपीएलचे चेअरमे राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार यूपीसीए तिरंग्याचे छोटे बॅच उपलब्ध करुन देतील. त्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार २६ जानेवारीच्या दिवशी ग्रीन पार्क स्टेडियमवर पहिला टी-२० सामना होतोय. ही यूपीसीएसाठी आनंदाची गोष्ट आहे. 

सामना संध्याकाळी सुरु होत असल्याने खेळाडू मैदानावर तिरंगा फडकवू शकणार नाही. त्यामुळे यूपीसीएकडून खेळाडूंना तिरंगा दिला जाणार आहे.