व्हिडिओ - मैदानात फुटबॉल खेळाडूनं मारली लाथ, रेफरीनं काढली बंदूक

फुटबॉल मॅच दरम्यान खेळाडूंमध्ये वादापासून मारहाणीपर्यंतच्या घटना आपण ऐकल्या असेल. पण ब्राझीलमध्ये एका क्लब मॅच दरम्यान एका खेळाडून रेफरीला रागात लाथ मारली. यानंतर रेफीरनं रागात आपल्या खिशातून बंदूक काढली आणि खेळाडूसमोर धरली. 

Updated: Sep 30, 2015, 11:00 AM IST
व्हिडिओ - मैदानात फुटबॉल खेळाडूनं मारली लाथ, रेफरीनं काढली बंदूक title=
सौजन्य- यूट्यूब व्हिडिओ

ब्राझील: फुटबॉल मॅच दरम्यान खेळाडूंमध्ये वादापासून मारहाणीपर्यंतच्या घटना आपण ऐकल्या असेल. पण ब्राझीलमध्ये एका क्लब मॅच दरम्यान एका खेळाडून रेफरीला रागात लाथ मारली. यानंतर रेफीरनं रागात आपल्या खिशातून बंदूक काढली आणि खेळाडूसमोर धरली. 

गॅब्रियल मुर्टा नावाच्या रेफरीनं खेळाडूला रेड कार्ड दाखवलं. रेड कार्डमुळे हा खेळाडू इतका चिडला की त्यानं रेफरी गॅब्रियलला लाथ मारली. मग काय रेफरी प्रचंड चिडला आणि सरळ ड्रेसिंग रूममध्ये गेला. तिथून त्यानं बंदूक आणली आणि मैदानाकडे गेला. हे पाहून सर्व खेळाडू रेफरीला शांत करू लागले.

पाहा व्हिडिओ - 

 

गॅब्रियल हा पोलीस फोर्समध्ये आहे. गॅब्रियलनं सांगितलं की, त्याच्यावर हल्ला झाला म्हणून स्वरक्षणासाठी त्यानं बंदूक काढली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.