उमेश यादवने तोडला ५८ वर्षांचा रेकॉर्ड

दक्षिण आफ्रिेकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पाहुण्या संघाविरुद्ध ३३७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला खरा मात्र या विजयासोबतच अनेक विक्रमही प्रस्थापित झाले. 

Updated: Dec 8, 2015, 11:54 AM IST
उमेश यादवने तोडला ५८ वर्षांचा रेकॉर्ड title=

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिेकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पाहुण्या संघाविरुद्ध ३३७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला खरा मात्र या विजयासोबतच अनेक विक्रमही प्रस्थापित झाले. 

अधिक वाचा - कोटला कसोटीचे १० रेकॉर्ड... जाणून घ्या

या कसोटी मालिकेत भारताच्या स्पिनर्सनी पूर्णपणे वर्चस्व गाजवले. मात्र अखेरच्या कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवनेही नवा रेकॉर्ड बनवत इतिहास रचलाय.उमेश यादवने अखेरच्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून ३३ षटके टाकली. 

अधिक वाचा - अश्विनने केला आणखी एक रेकॉर्ड

यात त्याने दुसऱ्या डावात २१ षटके टाकली. या षटकात त्याने ०.४२च्या इकॉनॉमी रेटने केवळ ९ धावा दिल्या. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज ट्रेवर लेस्ली गोडार्ड यांनी १९५७ मध्ये पोर्ट एलिझाबेथ येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १६ षटकांत ०.५६च्या इकॉनॉमी रेटने केवळ १२ धावा दिल्या होत्या.उमेशने ५८ वर्षांचा हा रेकॉर्ड तोडत नवा विक्रम प्रस्थापित केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.