यूएस ओपनमध्ये कोण मारणार बाजी?

यंदाचं शेवटचं ग्रँड स्लॅम अर्थात यूएस ओपन आजपासून सुरु होतंय. महिला एकेरीत सरेना व्हिल्यम्सवर तर पुरुष एकेरीत अँडी मरेच्या खेळाकडे साऱ्या टेनिस विश्वाचं लक्ष असणार आहे. 

Updated: Aug 29, 2016, 08:38 AM IST
यूएस ओपनमध्ये कोण मारणार बाजी? title=

न्यूयॉर्क : यंदाचं शेवटचं ग्रँड स्लॅम अर्थात यूएस ओपन आजपासून सुरु होतंय. महिला एकेरीत सरेना व्हिल्यम्सवर तर पुरुष एकेरीत अँडी मरेच्या खेळाकडे साऱ्या टेनिस विश्वाचं लक्ष असणार आहे. 

स्टेफी ग्राफच्या सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या रेकॉर्डची सेरेनानं बरोबरी साधलीय. यूएस ओपन जिंकून सरेना स्टेफीचा रेकॉर्ड मो़डण्याच्या तयारीनं आपल्या मायदेशात खेळणार आहे. तर यंदा सलग तीन गँड स्लॅमच्या अंतिम फेरीत धडक मारणारा अँडी मरे त्याच्या कारकीर्दीतली सर्वोत्तम कामगिरी नोंदवण्याच्या तयारीत आहे. 

दुसरीकडे यूएस ओपनमध्ये चौथं मानांकन मिळवलेला राफेल नदालच्या हार्ड कोर्टवरच्या कामगिरीकडेही जगाचं लक्ष असेल. 

भारताची टॉप सीडेड सानिया मिर्झा आणि तिची नवी साथीदार झेक गणराज्याची मोनिका निक्लूएसक्यू यांनी कनेक्टिकट ओपन जिंकून यूएस ओपन आधी आपला फॉर्म दाखवून दिलाय. त्यामुळे या जोडीच्या कामगिरीकडे भारतीय टेनिस फॅन्सचं लक्ष असेल.